!! श्री गणेशा !!

Sunday, April 24, 2011
Posted by MSFT



आयुष्यात खूप काही असे शब्द, अशा काही गोष्टी माझ्या भोवताली होत्या त्या मी कधीच सिरीयसली घेतल्या नाहीत, 'ब्लॉग लिखाण' हा त्यात्यलाच एक प्रकार (शब्द)... मी नेहमी ऐकायचो, कुठेतरी वाचायचो कि अमुक व्यक्ती ने ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तमुक व्यक्ती मायक्रो ब्लॉग अमक्या अमक्या साईट वर लिहतो आहे, आणि मनात विचार करायचो कि चला सध्या त्याला उद्योग नसेल, म्हणून त्याचे नवीन काहीतरी... पण जवळीक साधण्याच्या निमित्ताने, आणि साहजिकच माहिती-तंत्रज्ञान विभागाशी जवळचा संबंध असल्यामुळे काही ब्लॉग वाचण्याचा योग आला, त्यांच्या लिखाणाने, मला माझे ब्लॉग बद्दल विचार बदलायला प्रवृत्त केले. (माझे विचार पूर्वी असे होते कि, काय सकाळी उठून ब्लॉग वर लिहायचे कि आज ४ ला उठलो, आणि ५ वाजता अंघोळ केली, नंतर दिवसभर पुन्हा पलंगावर पडून, अशाच लिखाणाने ब्लॉग बद्दल माझे निगेटिव्ह विचार होते). पण जवळच्या काळात अश्या काही लेखकांच्या ब्लॉग्सशी अतिशय जवळचा संबंध आला, आणि माझे विचार बदलले.... आणि तसाही ब्लॉग लिहायला, मी काही हाडाचा लेखक नव्हतो कधीच, हा पण एक माझा विचार ज्यामुळे कधीच मी स्वतःच्या ब्लॉगचा कधीच विचार केला नव्हता. जे काही वाचनात-ऐकण्यात आले ते किंवा त्याचे पुनार्ष्ब्दांकन करून, किंवा माझ्या स्वतःच्या विचारात फेसबुक वर टाकायचो, बस माझे लिखाण इतकेच, एकंदर सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते ती एकदम अशीच.

सध्या तरी मराठीतूनच लिहिणार आहे, पहिले म्हणजे ती मला जरा जास्तच कळते, दुसरे असे कि त्याचा अभिमान, तिसरे असे कि संस्कृत नंतर मराठीच सगळ्यात जास्त पावरफुल भाषा आहे असा माझा समज (किंवा गैरसमज) आहे.

दुसरे कारण म्हणजे माझा जवळचा मित्र 'वैभव गायकवाड', त्याचे अनेक आभार, त्याने अक्षरशः मला मारून-मुटकून एखाद्या शेंबड्या रडक्या लहान मुलाला शाळेत आणतात, मी तुझी फी भरतो पण जा शाळेत, अक्षरशः तसेच त्याने मला ब्लॉगवर आणले( येण्यास प्रवृत्त केले), त्याला माझ्यावर भारी विश्वास कि मी उत्तम ब्लॉग लिहू शकेन... बघुयात त्याचा तरी विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करून बघू... लिखाण करायला सुरुवात करू, म्हणून आज इथे माझे पहिले पाउल....!!!!

तिसरे असे कि काही सु-परिचित व्यक्तींचा इतका जबरदस्त प्रभाव आहे कि त्यांचे देवानंतर त्यांचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करताच येणार नाही. एक म्हणजे आपला (हो!!...हक्काने म्हणतो) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, याचा (यांचा) आज ३८वा वाढ-दिवस, त्याबद्दल सचिनला शुभेच्छा, तो हि योग साधून, जुळवून (कसेही) आणलाच. आणखीन एक व्यक्ती म्हणजे सुपरस्टार रजनीकांत, काय माहिती काय आहे पण त्यांनी असा काही प्रभाव टाकला आहे माझ्यावर कि त्याचे वर्णन करायला शब्द सुद्धा नाहीयेत... त्यांचा प्रभाव पुढे येईलच लिखाणात, किंबहुना दिसेलच...
या वेळी मला अजय अतुल च्या एका गाण्याची ओळ आठवते...
"आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाच्या वेळी, अमुचा बघावा हो गोंधळ".... बघुयात काय गोधळ उडणार आहे ते
चला, पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार, आणि सगळेच आयुष्यात नेहमी पाठीशी असेच असाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना! गणपती बापा मोरया !!!!

9 comments:

Hemlata Sonawane said...

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी (ब्लॉग च्या)

Rahul Velapure said...

Thank you Very Much..!!

Unknown said...

Nice Blog Rahul.......

Unknown said...

राहुल तुझे मनापासून अभिनंदन ब्लॉग चालू केल्या बद्दल आणि ते सुद्धा माझी पहिलीच टिपणी असल्यामुळे मराठीतच
तुझी पावले अशीच उतरोत्तर पुढे पडत राहू दे
सुरवात उत्तम आहे, थोडक्यात पण बरेच काही सांगून गेलास, नवीन लेखाची वाट पाहतोय
तुझा शुभ चिंतक
सौरभ आगटे

Agate Saurabh said...

राहुल तुझे मनापासून अभिनंदन ब्लॉग चालू केल्या बद्दल आणि ते सुद्धा माझी पहिलीच टिपणी असल्यामुळे मराठीतच
तुझी पावले अशीच उतरोत्तर पुढे पडत राहू दे
सुरवात उत्तम आहे, थोडक्यात पण बरेच काही सांगून गेलास, नवीन लेखाची वाट पाहतोय
तुझा शुभ चिंतक
सौरभ आगटे

Rahul Velapure said...

आभारी आहे मित्रा

Gajrang Gaikwad said...

navin blog sathi shubhechha, tin lekha vachale chhan vatale, prayatna karat raha apoaap lihine soochel. navin navin lekh vachaila milot.
aashirvad ani shubhechha

Rahul Velapure said...

आभारी आहे सर.. तुमच्या मौल्यवान प्रतिक्रिया मला नक्कीच आणखी काही लिहायला प्रेरणा देतील.... काहीतरी उगाच खरडपट्टी केलेली वैभवला आवडली होती, त्याने त्याच्या ब्लॉग वर सुद्धा टाकली होती, आणि ते सुद्धा तुम्हाला आवडले ऐकून आनंद वाटला.. खरंच मनापासून धन्यवाद.. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहतील अशीच अपेक्षा...

Gajrang Gaikwad said...

tumhi pudhe ja aamche subhecha aani aashirvad sadaiva pathishi aahetach. aage badho ham tumhare sath hai.