सर्फ सिंड्रोम..
Monday, June 27, 2011Posted by
MSFT
1 Comments

मध्यंतरी एका संकेत-स्थळावर बातमी वाचली.
एका आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना २०० टक्के बोनस दिल्याची बातमी होती. बातमीपेक्षा माझे लक्ष वेधून घेतले त्या बातमी वरच्या प्रतिक्रियांनी. एक दोन नव्हे तब्बल १९२ प्रतिक्रिया होत्या. आयटीमध्ये नसणाऱ्या लोकांना २०० टक्के बोनस म्हणजे काय आणि तो कशाच्या दोनशे टक्के? पगाराच्या? की दुप्पट पगार? असा प्रश्न पडला असेल.
आयटीमधले पगार दोन प्रकारे विभागले जातात एक भाग असतो कायम स्वरूपी (Fixed Component) आणि दुसरा कार्य क्षमतेवर आधारित बदलता पगार (Variable Pay). कंपनी प्रमाणे या दोन्ही प्रकारांची टक्केवारी बदलत असते. म्हणजे १० लाख पगार असेल तर ६ लाख कायम स्वरूपी आणि ४ लाख कार्य क्षमतेवर आधारित. प्रत्येक तिमाहीला हिशोब झाले की कंपनी बदलता पगार किती टक्के द्यायचा ते ठरवते. तुमच्या ग्रुपचा, प्रोजेक्टचा नफा पाहून त्या ४ लाखातले किती पैसे द्यायचे ते कंपनी ठरवते. बातमी मधल्या कंपनीने हा बदलता पगार जेवढा कबूल केला होता त्यापेक्षा दुप्पट देण्याचे ठरवले होते.
बातमी एकदम खुशीची होती. पण त्या वरच्या प्रतिक्रिया विचारात पाडणाऱ्या होत्या. आयटी मधले पगार फार जास्त आहेत असे इतर उद्योगातील लोकांचे मत असले तरी त्या प्रतिक्रिया वाचून वाटले असते की, हे लोक दोन वेळचा शिधा आणि चहा या मोबाद्ल्यावारच काम करत आहेत. काही प्रातिनिधिक वाक्ये वाचा.
आयटी फिल्ड मध्ये आल्यावर जाणवले की, या आकड्यांच्या खेळा मुळे अपेक्षा काहीच्या काही वाढलेल्या आहेत. इथे पगार अवलंबून असतो तुमच्या अनुभवावर. किती वर्षे नोकरी झाली म्हणजे किती पगार याचे कोष्टक असते. त्यामुळे लायकी असो नसो, कर्तृत्व असो नसो, एवढा पगार मिळालाच पाहिजे. अशी धारणा इथल्या मुलांची होते. नोकरी बदलली म्हणजे किमान ३० टक्के पगार तरी वाढलाच पाहिजे असा सरळ हिशोब असतो.
परदेशी जाण्याची संधी म्हणजे अजून पैसा कमावण्याची संधी हे तर उघडच आहे. परदेशी जाणारे सगळेच जण बुद्धीच्या जोरावर आलेले नसतात काही जणांचे नशीब बलवत्तर असते म्हणून अश्या संधी मिळतात. बरे परदेशात गेले तरी सुखाने राहतात का हे लोक? आफ्रिकेत गेलेला म्हणतो युरोप का नाही? मी नेहमी आफ्रिकेतच का? दक्षिण अमेरिकेत गेलेला म्हणतो सिंगापूर काय वाईट होते? सिंगापूर वाला म्हणतो...तुमचे बरे आहे बचत तरी करता येते..इथे कसली महागाई आहे. पैसा कसा संपतो काही कळत नाही. युरोप मधले म्हणतात ५० युरोच्या अलाउन्समध्ये काही होत नाही. ४-५ युरो तर पाण्याच्या बाटलीलाच लागतात.
कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांचे पगार, त्यांचे राहणीमान पाहून बऱ्याच जणांना हे सगळे आपल्याला मिळाले पाहिजे आणि ते सुद्धा लगेच अशी घाई झालेली दिसते. अहो त्या लोकांनी पण आयुष्याची १५-२० वर्षे नोकरीत घालवल्या नंतर त्यांना हे दिवस दिसले हे कुणी लक्षात घेत नाही. सगळ्यांना २-३ बेडरूमचा फ्लॅट आणि गाडी अगदी ४-५ वर्षात हवीहवीशी वाटू लागते. सीइओ, सीएफओ, सीटीओ यांच्या पगाराचे आकडे वार्षिक अहवालात बघून मग उसासे टाकले जाऊ लागतात.
आयुष्य भर कष्ट करण्याचे दिवस जवळपास गेल्यात जमा आहेत. आजकालचा जमाना होंडा बायर्नच्या "secret" चा आहे. वाचले आहे का? नसले तर वाचा. एक सूत्र असे आहे की विश्व हा तुमचा एक कॅटलॉग असून त्यात तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मागा, मिळालीच पाहिजे. ती सुद्धा आज, आता, ताबडतोब. सर्वाना यश हवे आहे, आज आता. त्याची किंमत मोजण्याची तयारी असली तरी संधी मिळत नाही म्हणून चिडचिड होत राहते.
मध्यंतरी आर्थिक मंदीच्या काळात आयटी कंपन्यांनी पगारवाढ थांबवली होती किंवा काही ठिकाणी पगारही कमी केले होते. २०१० मध्ये परिस्थिती सुधारली तेव्हा अगदी ७०-८० टक्क्या पर्यंत पगारवाढ झाली. पण माझ्या तरुण मित्रांपैकी बऱ्याच जणांचे तोंड वाकडेच. का रे बाबा? का नाराज दिसतो आहे? उत्तर यायचे तो माझ्या बरोबरीचा नोकरी सोडून गेला. त्याचा पगार अजूनही माझ्या पेक्षा जास्तीच आहे. हा "सर्फ सिंड्रोम" (सर्फ सिंड्रोम - उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी?) तर मोठ्या प्रमाणावर पसरलेला दिसतो. नुसता पगारातच नाही तर मिळणाऱ्या संधी, प्रोजेक्ट, ग्राहकाने केलेलं कौतुक, साइट लोकेशन अश्या सगळ्याच बाबतीत बरोबरी होतच राहते. फ्रेशर इंजिनियर, एम.बी.ए. यांना मंदीच्या काळात तर किंमतच नव्हती. अक्षरशः ८०००-१०००० पगारावर काम करत होते.
आयटी मधले पगार आणि नोकऱ्या बदलण्याचे दुष्टचक्र न समजणारे आहे. कंपनीला गरज असली की, तुम्ही म्हणाल त्या पगाराला तुम्हाला घेतले जाते. मग तुमच्या एवढाच अनुभव, कौशल्य असणारा तुमचा मित्र कावतो. त्याला अशी नोकरी मिळण्याचा योग आलेला नसतो. कंपनीची गरज आणि तुमची उपलब्धता असा योगच जमून यावा लागतो. अगदी लग्न जुळण्याइतके अवघड आहे हे. पण हे सत्य लक्षात न घेता माणसे जीव जळत बसतात. त्याला मिळाले मग मला पण पाहिजे म्हणून जीवाला त्रास करून घेतात.
आर्थिक सुबत्तेचे महत्व मी नाकारत नाही. हट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती अशी भोळसट मांडणीही मला करायची नाहीये. या अल्प संतुष्ट विचारांनी आपले बरेच नुकसान केले आहे. कर्तृत्व दाखवण्याच्या संधी सोडता कामा नयेत, समृद्धी मिळवलीच पाहिजे. तरुणांनी अल्प-संतुष्ट राहू नये या मताचा मी पण आहे. पण जे आपल्याकडे आहे त्याकडे दुर्लक्ष करून पळत्याच्या पाठीमागे धावत राहणे दमछाक करणारे आहे. जीवनातले आनंदाचे क्षण हिरावून घेणारे आहे. जे कमवत आहोत त्याबद्दल देणाऱ्या कंपनीचे ऋणी राहण्याचे, जे मिळाले आहे त्या बद्दल समाधानी असण्याचे तर आम्ही विसरूनच जात आहोत.
या प्रतिक्रियांवर चर्चा करत असताना एका तरुण सहकार्याने विचारले, "आपल्याकडे तर बोनसची चर्चा पण नाहीये तरी तुम्ही कसे निवांत दिसता?" मी म्हणालो,"तुमचा पगार, मिळकत, बोनस याचा आणि तुमच्या आनंदी असण्याचाही काही संबंध नाही."

- " कसले काय अजिबात २०० टक्के दिलेले नाहीत. मला तर फक्त १५० टक्केच मिळाले आहेत."
- "अहो २०० टक्के तर फक्त वरच्या बॉस लोकांना मिळाले. आम्हाला तर काहीच दिले नाही "
- "तुम्ही काही म्हणा पण एक रुपयाच्या पगाराचे ५००% म्हणजे फक्त ५ रुपयेच होतात हो" ,
- " आणि एवढे करून नव्याने नोकरी जॉयीन झालेल्या लोकांना यांनी काहीच दिले नाही."
- "मी दोन महिन्यांपूर्वी नोकरी सोडली आहे, पण हे लोक मला काहीच देणार नाहीत. कारण जे आता नोकरीमध्ये आहेत त्यांनाच फक्त हा बोनस मिळणार आहे"
आयटी फिल्ड मध्ये आल्यावर जाणवले की, या आकड्यांच्या खेळा मुळे अपेक्षा काहीच्या काही वाढलेल्या आहेत. इथे पगार अवलंबून असतो तुमच्या अनुभवावर. किती वर्षे नोकरी झाली म्हणजे किती पगार याचे कोष्टक असते. त्यामुळे लायकी असो नसो, कर्तृत्व असो नसो, एवढा पगार मिळालाच पाहिजे. अशी धारणा इथल्या मुलांची होते. नोकरी बदलली म्हणजे किमान ३० टक्के पगार तरी वाढलाच पाहिजे असा सरळ हिशोब असतो.
परदेशी जाण्याची संधी म्हणजे अजून पैसा कमावण्याची संधी हे तर उघडच आहे. परदेशी जाणारे सगळेच जण बुद्धीच्या जोरावर आलेले नसतात काही जणांचे नशीब बलवत्तर असते म्हणून अश्या संधी मिळतात. बरे परदेशात गेले तरी सुखाने राहतात का हे लोक? आफ्रिकेत गेलेला म्हणतो युरोप का नाही? मी नेहमी आफ्रिकेतच का? दक्षिण अमेरिकेत गेलेला म्हणतो सिंगापूर काय वाईट होते? सिंगापूर वाला म्हणतो...तुमचे बरे आहे बचत तरी करता येते..इथे कसली महागाई आहे. पैसा कसा संपतो काही कळत नाही. युरोप मधले म्हणतात ५० युरोच्या अलाउन्समध्ये काही होत नाही. ४-५ युरो तर पाण्याच्या बाटलीलाच लागतात.
कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांचे पगार, त्यांचे राहणीमान पाहून बऱ्याच जणांना हे सगळे आपल्याला मिळाले पाहिजे आणि ते सुद्धा लगेच अशी घाई झालेली दिसते. अहो त्या लोकांनी पण आयुष्याची १५-२० वर्षे नोकरीत घालवल्या नंतर त्यांना हे दिवस दिसले हे कुणी लक्षात घेत नाही. सगळ्यांना २-३ बेडरूमचा फ्लॅट आणि गाडी अगदी ४-५ वर्षात हवीहवीशी वाटू लागते. सीइओ, सीएफओ, सीटीओ यांच्या पगाराचे आकडे वार्षिक अहवालात बघून मग उसासे टाकले जाऊ लागतात.
आयुष्य भर कष्ट करण्याचे दिवस जवळपास गेल्यात जमा आहेत. आजकालचा जमाना होंडा बायर्नच्या "secret" चा आहे. वाचले आहे का? नसले तर वाचा. एक सूत्र असे आहे की विश्व हा तुमचा एक कॅटलॉग असून त्यात तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मागा, मिळालीच पाहिजे. ती सुद्धा आज, आता, ताबडतोब. सर्वाना यश हवे आहे, आज आता. त्याची किंमत मोजण्याची तयारी असली तरी संधी मिळत नाही म्हणून चिडचिड होत राहते.
मध्यंतरी आर्थिक मंदीच्या काळात आयटी कंपन्यांनी पगारवाढ थांबवली होती किंवा काही ठिकाणी पगारही कमी केले होते. २०१० मध्ये परिस्थिती सुधारली तेव्हा अगदी ७०-८० टक्क्या पर्यंत पगारवाढ झाली. पण माझ्या तरुण मित्रांपैकी बऱ्याच जणांचे तोंड वाकडेच. का रे बाबा? का नाराज दिसतो आहे? उत्तर यायचे तो माझ्या बरोबरीचा नोकरी सोडून गेला. त्याचा पगार अजूनही माझ्या पेक्षा जास्तीच आहे. हा "सर्फ सिंड्रोम" (सर्फ सिंड्रोम - उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी?) तर मोठ्या प्रमाणावर पसरलेला दिसतो. नुसता पगारातच नाही तर मिळणाऱ्या संधी, प्रोजेक्ट, ग्राहकाने केलेलं कौतुक, साइट लोकेशन अश्या सगळ्याच बाबतीत बरोबरी होतच राहते. फ्रेशर इंजिनियर, एम.बी.ए. यांना मंदीच्या काळात तर किंमतच नव्हती. अक्षरशः ८०००-१०००० पगारावर काम करत होते.
आयटी मधले पगार आणि नोकऱ्या बदलण्याचे दुष्टचक्र न समजणारे आहे. कंपनीला गरज असली की, तुम्ही म्हणाल त्या पगाराला तुम्हाला घेतले जाते. मग तुमच्या एवढाच अनुभव, कौशल्य असणारा तुमचा मित्र कावतो. त्याला अशी नोकरी मिळण्याचा योग आलेला नसतो. कंपनीची गरज आणि तुमची उपलब्धता असा योगच जमून यावा लागतो. अगदी लग्न जुळण्याइतके अवघड आहे हे. पण हे सत्य लक्षात न घेता माणसे जीव जळत बसतात. त्याला मिळाले मग मला पण पाहिजे म्हणून जीवाला त्रास करून घेतात.
आर्थिक सुबत्तेचे महत्व मी नाकारत नाही. हट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती अशी भोळसट मांडणीही मला करायची नाहीये. या अल्प संतुष्ट विचारांनी आपले बरेच नुकसान केले आहे. कर्तृत्व दाखवण्याच्या संधी सोडता कामा नयेत, समृद्धी मिळवलीच पाहिजे. तरुणांनी अल्प-संतुष्ट राहू नये या मताचा मी पण आहे. पण जे आपल्याकडे आहे त्याकडे दुर्लक्ष करून पळत्याच्या पाठीमागे धावत राहणे दमछाक करणारे आहे. जीवनातले आनंदाचे क्षण हिरावून घेणारे आहे. जे कमवत आहोत त्याबद्दल देणाऱ्या कंपनीचे ऋणी राहण्याचे, जे मिळाले आहे त्या बद्दल समाधानी असण्याचे तर आम्ही विसरूनच जात आहोत.
या प्रतिक्रियांवर चर्चा करत असताना एका तरुण सहकार्याने विचारले, "आपल्याकडे तर बोनसची चर्चा पण नाहीये तरी तुम्ही कसे निवांत दिसता?" मी म्हणालो,"तुमचा पगार, मिळकत, बोनस याचा आणि तुमच्या आनंदी असण्याचाही काही संबंध नाही."
तुम्ही पण आयटीमध्ये असाल आणि सर्फ सिंड्रोमचे शिकार असाल आणि प्रामाणिकपणे विचार करत असाल तर लक्षात येईल. जीवनातला आनंद हा पगार, बोनस, मालमत्तेच्या, डबल इन्कमपेक्षा तुमच्या मनातल्या विचारांवर, दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असतो.
1 comments:
- arati M said...
-
,"तुमचा पगार, मिळकत, बोनस याचा आणि तुमच्या आनंदी असण्याचाही काही संबंध नाही.".. agadi barobar!.. lekh far chan ahe.
- March 6, 2013 at 11:24 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)