पुनरागमन

Sunday, November 6, 2011
Posted by MSFT





नमस्कार,
आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग पोस्ट करताना आनंद, थोडेसे आश्चर्य, थोडेसे दुख्खः, थोडीशी लाज.... अशीच काहीशी विचित्र मनःस्थिती झालेली आहे. ब्लॉगिंग मध्ये येऊन जास्त दिवस झाले नसताना पुनरागमनाची वेळ आली आहे.... अर्थात, त्यासाठी माझ्याकडे भरपूर कारणेही होती, एकतर माझा कम्प्युटर(Laptop) त्यावर ज्यूस सांडून सगळाच खराब झाला होता, परिणामी त्यासाठी बायकोची अखंड बडबड laptop खराब झाला म्हणून नव्हे तर तिने खूप मेहनतीने केलेला ज्यूस मी माझ्या निष्काळजीपणा मुळे वाया घालवला म्हणून, आणि दुसरे म्हणजे आमच्या इनर-सर्कल ग्रुपची रोजची बोलणी 'लिही कि रे भाड्या', कधी लिहिणार, कधी येणार तुझा ब्लॉग, अशी बोलणी तर मला नित्याचीच झाली होती.

परंतु, माझ्या ब्लॉगिंगला एका अर्थी पूर्णविराम लागला होता. आमच्या ग्रुपने ब्लॉगच्या डोमेन-नेमच्या लिलावाची वेळ आणली होती, शेवटी 'जनाची नाही तर मनाची' या नियमाने वेळात वेळ काढून ब्लॉग पोस्ट करायच्या मागे लागलो.




पण, इतके दिवस कोणत्याही विषयावर लिहिले नसल्यामुळे, आणि मुळातच लिखाणाच्या असलेल्या कमी अनुभवामुळे, आज लिहू, उद्या लिहू करीत वेळ मारून नेण्यात इतका मोठ्ठा कालावधी कधी गेला समजलेच नाही . पुन्हा पुनरागमन करताना नक्की कोणत्या विषयातून खरडपट्टी सुरु करायची या विचारात आणखीन काही वेळ घालवला, वेळ घालवण्याचे दुसरे कारण म्हणजे ऑफिसमध्ये असलेल्या कामाच्या व्यस्ततेमुळे लिखाणाला वेळ देऊ शकत नव्हतो. पूर्वीच्या झालेल्या लिखाणातील चुका, मित्रांची खाल्लेली बोलणी सर्वांमुळे माझ्यातला आत्मविश्वास डळमळीत झाला होता. बऱ्याचदा लिखाणाला सुरुवात करायचो आणि मधेच काहीतरी विचार करून अर्धवट ड्राफ्टमध्ये सेव्ह करून सोडून द्यायचो. पण आता ठरवलेले आहे, कितीही झाले तरी आपले लिखाण थोडे फार का होईना पुन्हा सुरु करायचे...
माझ्यावर अविनाश वीर, आशय गुणे, जगदीश पाटील, वैभव गायकवाड यांच्या लिखाणाचा चांगलाच प्रभाव पडत चालला होता, सगळे काय ऐकत नव्हते, धडाधड लिखाण पोस्ट करत सुटले होते, त्यामुळे मी कशी आणि कुठून यांच्याबोरोबर लिंक लावू असा विचार कायम मनात येत होता...
पुन्हा एकदा आमचे परममित्र अविनाश वीर, वैभव गायकवाड यांचे मनापासून आभार मानून, काहीतरी खरडपट्टी ला सुरुवात करावी म्हणतो, कारण त्यांच्याकडून मला रोज शिव्यांचा प्रसाद मिळतो... आणि दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे :)

अजून एक म्हणजे असे कि, आमच्या इनर सर्कल ग्रुप ने एकत्र येऊन काहीतरी करावे असे बरेच दिवस चालले होते, आता ते हि स्वप्न पूर्णत्वाकडे चालले आहे... त्याबद्दल लवकरच अपडेट येईलच...



शेवटी सगळी दिलेली कारणे हि माझी आणि माझ्यासाठीच... :)

1 comments:

Avinash said...

 राहुल...नशीब समज की तुझा आम्ही सौरभ गांगुली नाही केला. गांगुलीसारखा
मुंडावळ्या घालून बसलास तरी तुझे आम्ही लग्न लावत नाहीय. तुला पुनरागमनाची
संधी दिलीय. lol