Showing posts with label राजकीय. Show all posts
Showing posts with label राजकीय. Show all posts
झुंबडशाही..
Monday, January 2, 2012Posted by
MSFT
2 Comments
२०१०च्या सरते शेवटी नववर्ष स्वागताचे बिगुल वाजवत साऱ्या देशवासीयांनी २०११चे स्वागत केले. नवीन वर्ष सर्वाना सुखाचे आणि समृद्धीचे जावो एकमेकांना शुभेच्छा देत नवीन वर्षाचे स्वागत केले होते. या वर्षात आपण काय कमावले आणि काय गमावले?? कमावण्यापेक्षा या वर्षात काय गमावले याचा विचार केला तर या वर्षात आपण अपेक्षेपेक्षा जास्तच गमावले ते लोकशाही आणि संसदेचा झालेला ऱ्हास.
२०११ उजाडत असताना आपले सरकार याहीपेक्षा दुप्पट जोमाने जनतेच्या कल्याणासाठी झटेल, जनतेमध्ये निर्माण झालेली मरगळ आणि निराशावादाची जळमटे दूर करण्यासाठी आपल्या देशातच्या कारभाराची प्रक्रिया सुधारेल, असा ‘निर्धार’ आपल्या पंतप्रधानांनी भारतीयांना नववर्षांच्या शुभेच्छा देताना व्यक्त केला होता. आपल्या कारभाराच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि कमकुवतपणावर ‘कोर्स करेक्शन’द्वारे मात करण्याच्या लोकशाहीच्या क्षमतेविषयी विश्वास कायम राखला पाहिजे अशी अपेक्षा त्यानी आपल्याकडून केली.
पण, महागाई, घोटाळे आणि भ्रष्टाचारामुळे बरबटलेल्या २०१०ची कटुता २०११ मध्ये विस्मृतीत जमा होण्याची आशा फोल ठरली. त्यांनी ठरवल्या प्रमाणे ‘कोर्स करेक्शन’ तर दूरच, टू जी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ गेम्स, आदर्श सोसायटीसह देशातील तमाम घोटाळ्यांवरून 'टीम अण्णा' सरकारच्या मानगुटीवर बसली.
Subscribe to:
Posts (Atom)
