सर्फ सिंड्रोम..

Monday, June 27, 2011
Posted by MSFT




मध्यंतरी एका संकेत-स्थळावर बातमी वाचली.


एका आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना २०० टक्के बोनस दिल्याची बातमी होती. बातमीपेक्षा माझे लक्ष वेधून घेतले त्या बातमी वरच्या प्रतिक्रियांनी. एक दोन नव्हे तब्बल १९२ प्रतिक्रिया होत्या. आयटीमध्ये नसणाऱ्या लोकांना २०० टक्के बोनस म्हणजे काय आणि तो कशाच्या दोनशे टक्के? पगाराच्या? की दुप्पट पगार? असा प्रश्न पडला असेल.


आयटीमधले पगार दोन प्रकारे विभागले जातात एक भाग असतो कायम स्वरूपी (Fixed Component) आणि दुसरा कार्य क्षमतेवर आधारित बदलता पगार (Variable Pay). कंपनी प्रमाणे या दोन्ही प्रकारांची टक्केवारी बदलत असते. म्हणजे १० लाख पगार असेल तर ६ लाख कायम स्वरूपी आणि ४ लाख कार्य क्षमतेवर आधारित. प्रत्येक तिमाहीला हिशोब झाले की कंपनी बदलता पगार किती टक्के द्यायचा ते ठरवते. तुमच्या ग्रुपचा, प्रोजेक्टचा नफा पाहून त्या ४ लाखातले किती पैसे द्यायचे ते कंपनी ठरवते. बातमी मधल्या कंपनीने हा बदलता पगार जेवढा कबूल केला होता त्यापेक्षा दुप्पट देण्याचे ठरवले होते.

मला देवाने पछाडलं...!!!!

Wednesday, April 27, 2011
Posted by MSFT




शिष्यास न लाविती साधन।
न करविती इंद्रिय दमन।
ऐसे गुरू अडक्याचे तीन……
मिळाले तरी त्यजावे..!!


हुश्श... सुटलो, झाल्या सगळ्या प्रथा पार पाडून…….

कालपासून मला काय झालंय, काहीच कळत नव्हतं. संत तुकारामांनी म्हणल्याप्रमाणे "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" सारखे ती एक व्यक्ती इतक्या जबरदस्त तऱ्हेने माझ्या मागे लागली कि, पळताभुई थोडी करून सोडली, आयुष्यात ज्या व्यक्तीचा कधीच विचार केला नव्हता, ती सपाटून मागे लागली होती, मी घरी असताना, पेपर वाचताना, लोकल मध्ये प्रवास करताना, ऑफिस मध्ये, रस्त्यांवर अक्षरशः सगळीकडेच, मला नको नको करून सोडलं होतं त्याने. त्याचा तो चेहरा, त्याचे ते व्यक्तिमत्व अक्षरशः सगळीकडेच दिसायला सुरवात झाली होती एव्हाना. समोर येईल ती व्यक्ती मला त्याच माणसासारखी वाटत होती, ट्रेन मध्ये सगळे चेहरे सारखेच, ऑफिस मध्ये बॉसचा चेहरा ही तसाच वाटायला लागला होता. जेथे जाईल तेथे, रस्त्यावरी होर्डिंग मध्ये सुद्धा तोच, पेपर मध्ये सुद्धा तोच, टीव्ही वर तर विचारायची सोयच नव्हती, प्रत्येक सिरीयल मध्ये सुद्धा, टीव्हीवरील सासू सुना यांच्या भांडणामध्ये सुद्धा, हद्द…..दबंग बघताना सुद्धा तोच, सलमानच्या जागीही, त्याचाच चेहरा दिसायला सुरुवात झाली होती, सार्वजनिक सुलभ मधील ग्राफिटी मध्ये, ऑफिस मधल्या संगणकावर सुद्धा ऑफिस च्या नावाचा वॉल-पेपर लोगो असायचा, त्याच्याजागी सुद्धा मला तीच व्यक्ती गिरे तो भी टांग उपर अश्या अविर्भावात. एखाद्या प्रियकराला आपली प्रेयसी सगळी कडे दिसते अगदी तशीच....!!!!!!

!! श्री गणेशा !!

Sunday, April 24, 2011
Posted by MSFT



आयुष्यात खूप काही असे शब्द, अशा काही गोष्टी माझ्या भोवताली होत्या त्या मी कधीच सिरीयसली घेतल्या नाहीत, 'ब्लॉग लिखाण' हा त्यात्यलाच एक प्रकार (शब्द)... मी नेहमी ऐकायचो, कुठेतरी वाचायचो कि अमुक व्यक्ती ने ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तमुक व्यक्ती मायक्रो ब्लॉग अमक्या अमक्या साईट वर लिहतो आहे, आणि मनात विचार करायचो कि चला सध्या त्याला उद्योग नसेल, म्हणून त्याचे नवीन काहीतरी... पण जवळीक साधण्याच्या निमित्ताने, आणि साहजिकच माहिती-तंत्रज्ञान विभागाशी जवळचा संबंध असल्यामुळे काही ब्लॉग वाचण्याचा योग आला, त्यांच्या लिखाणाने, मला माझे ब्लॉग बद्दल विचार बदलायला प्रवृत्त केले. (माझे विचार पूर्वी असे होते कि, काय सकाळी उठून ब्लॉग वर लिहायचे कि आज ४ ला उठलो, आणि ५ वाजता अंघोळ केली, नंतर दिवसभर पुन्हा पलंगावर पडून, अशाच लिखाणाने ब्लॉग बद्दल माझे निगेटिव्ह विचार होते). पण जवळच्या काळात अश्या काही लेखकांच्या ब्लॉग्सशी अतिशय जवळचा संबंध आला, आणि माझे विचार बदलले.... आणि तसाही ब्लॉग लिहायला, मी काही हाडाचा लेखक नव्हतो कधीच, हा पण एक माझा विचार ज्यामुळे कधीच मी स्वतःच्या ब्लॉगचा कधीच विचार केला नव्हता. जे काही वाचनात-ऐकण्यात आले ते किंवा त्याचे पुनार्ष्ब्दांकन करून, किंवा माझ्या स्वतःच्या विचारात फेसबुक वर टाकायचो, बस माझे लिखाण इतकेच, एकंदर सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते ती एकदम अशीच.

सध्या तरी मराठीतूनच लिहिणार आहे, पहिले म्हणजे ती मला जरा जास्तच कळते, दुसरे असे कि त्याचा अभिमान, तिसरे असे कि संस्कृत नंतर मराठीच सगळ्यात जास्त पावरफुल भाषा आहे असा माझा समज (किंवा गैरसमज) आहे.

दुसरे कारण म्हणजे माझा जवळचा मित्र 'वैभव गायकवाड', त्याचे अनेक आभार, त्याने अक्षरशः मला मारून-मुटकून एखाद्या शेंबड्या रडक्या लहान मुलाला शाळेत आणतात, मी तुझी फी भरतो पण जा शाळेत, अक्षरशः तसेच त्याने मला ब्लॉगवर आणले( येण्यास प्रवृत्त केले), त्याला माझ्यावर भारी विश्वास कि मी उत्तम ब्लॉग लिहू शकेन... बघुयात त्याचा तरी विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करून बघू... लिखाण करायला सुरुवात करू, म्हणून आज इथे माझे पहिले पाउल....!!!!

तिसरे असे कि काही सु-परिचित व्यक्तींचा इतका जबरदस्त प्रभाव आहे कि त्यांचे देवानंतर त्यांचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करताच येणार नाही. एक म्हणजे आपला (हो!!...हक्काने म्हणतो) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, याचा (यांचा) आज ३८वा वाढ-दिवस, त्याबद्दल सचिनला शुभेच्छा, तो हि योग साधून, जुळवून (कसेही) आणलाच. आणखीन एक व्यक्ती म्हणजे सुपरस्टार रजनीकांत, काय माहिती काय आहे पण त्यांनी असा काही प्रभाव टाकला आहे माझ्यावर कि त्याचे वर्णन करायला शब्द सुद्धा नाहीयेत... त्यांचा प्रभाव पुढे येईलच लिखाणात, किंबहुना दिसेलच...
या वेळी मला अजय अतुल च्या एका गाण्याची ओळ आठवते...
"आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाच्या वेळी, अमुचा बघावा हो गोंधळ".... बघुयात काय गोधळ उडणार आहे ते
चला, पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार, आणि सगळेच आयुष्यात नेहमी पाठीशी असेच असाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना! गणपती बापा मोरया !!!!